गोष्ट मुंबईची: भाग १३२ | ११६ वर्षांपूर्वी मुंबईत अस्तित्वात आली होती पर्यावरणस्नेही बससेवा

गोष्ट मुंबईची: भाग १३२ | ११६ वर्षांपूर्वी मुंबईत अस्तित्वात आली होती पर्यावरणस्नेही बससेवा

मुंबई लोकल रेल्वेप्रमाणेच बेस्ट उपक्रमाची बससेवा हीदेखील मुंबईकरांची जीवनवाहिनीच. कदाचित कांकणभर अधिक महत्त्व या बससेवाला आहे, कारण ती मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचते. ५०-६० दशकेच नव्हे तर तब्बल १५० वर्षे ही सेवा अविरत सुरू आहे. या सेवेनेही अनेक बदल पाहिले. मुंबईकरांच्या प्रवासाच्या बदललेल्या गरजा पाहिल्या आणि त्यानुसार स्वतःच्या सेवेतही अनेक बदल केले. अनेकदा नेहमीच्याच असलेल्या गोष्टींकडे आपण फारशा गांभीर्याने पाहात नाही. पण हा हा म्हणता या बससेवेने आता तब्बल शतकोत्तर सुवर्णमहोत्सवात प्रवेश केला आहे. अशा प्रकारची ही देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील अनोखी सेवा आहे. एखादा नवीन प्रकल्प आला की, त्याला विरोध होणे हा आपला नित्याचाच अनुभव आहे. असाच अनुभव या बेस्टलाही आला. तब्बल १५० वर्षांपूर्वी जेव्हा ट्रामसेवा सुरू झाली, त्याही वेळेस त्या ट्राम सेवेला याच मुंबईत विरोध झाला. हा विरोध कशासाठी झाला आणि या ट्रामसेवेने नंतर कोणती रूपांतरे घडवून आणली, मुंबईच्या प्रगतीत तिचे योगदान काय हे सारे जाणून घेण्यासाठी 'गोष्ट मुंबईची'चा हा भाग पाहायलाच हवा.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2023-10-21

Duration: 15:24

Your Page Title