पहाटेच्या सरकारच्या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन - संजय राऊत

पहाटेच्या सरकारच्या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन - संजय राऊत

सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणं महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचं कर्तव्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वर टीका केल्याने मला वाईट वाटले नाही, मात्र ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वातच विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केलेले आहेत, पाठिंब्याची गरज होती त्या वेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली, आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या. आज जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची गरज होती त्यावेळी पण फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते आहे.br यावेळी संजय राऊत यांनी हे ही सांगितले की, अजित पवार यांना चांगलं माहिती आहे सरकारला कसा टेकू लावायचा, ज्यावेळी पहाटे सरकार बनलं, दुपारी कोसळलं, त्यानंतर पुन्हा ते बनलं या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत, असं ते म्हणाले.


User: Lok Satta

Views: 5.5K

Uploaded: 2021-04-16

Duration: 05:05

Your Page Title