अरेरे...शेत शिवारात झाला चक्क लाल अश्रूंचा सडा, पहा काय झाले असे...

अरेरे...शेत शिवारात झाला चक्क लाल अश्रूंचा सडा, पहा काय झाले असे...

वाशीम: कोरोनाने व्यापार उद्योग बंद झाल्याचे कवित्व सगळीकडेच ऐकावयास मिळते. मात्र शहराबरोबर गावखेड्यात कोरोनामुळे बांधावरचे उसासे बेदखल होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या प्रकोपात उजाड शिवारात घामाचे लाल अश्रू ही कहाणी सांगत आहेत.br br याचा सर्वात जास्त फटका फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात ग्राहक मिळत नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी येथील रामकीसन काळबांडे यांना सहा एकरातील कलिंगडावर रोटावेटर फिरविण्याची दुर्दवी वेळ आली आहे. लेकरागत रक्ताचे पाणी करून पिकविलेले टरबूज डोळ्यादेखत नष्ट करतांना या शेतकर्याच्या भावना अनावर होवून डोळ्यातून वाहणारे अश्रू कोरोनाची आपबिती कथन करीत आहेत.


User: Sakal

Views: 333

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:15

Your Page Title