ही मरणवाट पुन्हा किती बळी घेणार?

ही मरणवाट पुन्हा किती बळी घेणार?

धाबा (जि. चंद्रपूर) : भविष्यातील राज्यमार्ग अशी ओळख असलेला गोंडपिपरी-पोडसा मार्ग मरणवाट ठरत आहे. मार्गात हजारो खड्डे पडले आहेत. दरवर्षी लाखो रुपये खर्चून खड्डे बुजविले जातात. मात्र, काही दिवसातच बुजविलेले खड्डे पुन्हा डोकं बाहेर काढतात. या मार्गाने अनेकांचा बळी घेतला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तसा नवाकोरा मार्ग बनविण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भूमिपूजनही उरकविण्यात आले. "पूजन' झाले मात्र प्रत्यक्षात कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या मरणवाटेवर पुन्हा किती बळी गेल्यावर शासनाचे डोळे उघळणार असा संतप्त सवाल आता नागरिक करीत आहेत.


User: Sakal

Views: 2K

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:00

Your Page Title