कोतेवाडा शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ | Latest Marathi News I आजच्या ठळक बातम्या | Sakal Media |

कोतेवाडा शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ | Latest Marathi News I आजच्या ठळक बातम्या | Sakal Media |

गुमगाव (जि. नागपूर) : हिंगणा तालुक्‍यातील गुमगाव येथून हाकेच्या अंतरावरील कोतेवाडा शिवारातील शेतात नादुरुस्त रोहित्र बदलविण्यासाठी काही दिवसांपासून बैलगाडीवर ठेवण्यात आलेल्या रोहित्राची तोडफोड करून बुधवारी रात्री ऑइल आणि लोखंडी रॉड अशा साठ ते सत्तर हजार रुपयांच्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्यावर चोरट्यांनी हात साफ केला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. प्रतिकूल वातावरण आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आधीच त्रस्त आहेत. आता तर वारंवार होणाऱ्या चोरीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. (व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)br br Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.


User: Sakal

Views: 590

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:07