नागपूरसह विदर्भातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

नागपूरसह विदर्भातील शुक्रवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

नागपूर : शहरात सातत्याने कोरोनाबाधित आणि बळींची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरावर लॉकडाउनचे संकट घोंगावत असतानाच महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली. शनिवार आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू लागू राहील.br br नागपूर : राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक असून विद्यार्थ्यांचा भविष्याचे कारण देत, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची मागणी करीत आहे. मात्र, भाजपा शिक्षक आघाडीने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे अशी भूमिका घेतली आहे.br br नागपूर (ग्रामीण) : नरखेड वन परिक्षेत्रातील शासकीय वनात अवैध उत्खनन, शासकीय वनात अवैध वृक्षतोड व मालकी खसरा प्रकरण तयार करून वृक्षतोड आदेश दिल्याप्रकरणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. टुले आणि लोहारी सांवगा येथील जगमगावकर उके याला निलंबित करण्यात आले आहे.br br आनंदवन (जि. चंद्रपूर) : राज्य सेवा आयोगाच्या कर सहाय्यक परीक्षेत राज्यात मुलींमध्ये वर्षा शेडमे तिसरी आली आहे. एकाच वर्षी राज्य सेवा आयोगाच्या दोन परीक्षेत तिने यश मिळविले. परिस्थितीशी दोन हात करीत वर्षाने एकाच वर्षी राज्य सेवा आयोगाच्या दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या. br br गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 239 असून, त्यापैकी 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 89.5 टक्‍के असून महाराष्ट्रात अव्वल असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी दिली.br br #Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardhabr br Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.


User: Sakal

Views: 2.5K

Uploaded: 2021-04-28

Duration: 04:02

Your Page Title