सकाळ पॉकेट अपडेट्स | Corona Updates | Marathi News | Top 10 News | India | Maharashtra | Sakal Media

सकाळ पॉकेट अपडेट्स | Corona Updates | Marathi News | Top 10 News | India | Maharashtra | Sakal Media

सकाळच्या पॉकेट अपडेट्स मध्ये आपण जाणून घेणार आहोत तीन मिनटात टॉप १० न्यूज. त्या सर्व बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सविस्तर बातम्या वाचायला मिळतील.br br १. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 83 हजार 809 नवीन रुग्णांचं निदान असून 1,054 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५० लाखांच्या जवळ जाऊन ठेपलाय. br br २. राज्यात आतापर्यंत दहा लाख 77 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 29 हजार 894 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत साडेसात लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. br br br ३. मराठा आरक्षणाबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे सभागृहामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तमिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा प्रश्‍न त्यांनी संसदेत केला.br br ४. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही. अध्यादेश काढणे हे स्थगितीला उत्तर असू शकत नाही. सरकार मराठा समाजाला उल्लू बनवत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.br br br ५. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. सिसोदिया यांच्या कोरोनासदृष्य लक्षणे दिसून येत होती, चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला.br br br ६. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. यामुळे पेट्रोलच्या दरात 13 ते 14 पैशांची घट झाली आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरातही प्रतिलिटर 14 ते 16 पैशांची घट झाली आहे. br br ७. फेब्रुवारमध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. ही दंगल सुनियोजित होती आणि या प्रकरणी आरोपींच्या विरोधात न्यायालयात 17 सप्टेंबरला आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.br br br ८. संयुक्त राष्ट्रामध्ये चीनला मोठा झटका बसला आहे. युनायटेड नेशनच्या कमीशन ऑन स्टेटस ऑफ वूमन संस्थेच्या सदस्यपदी भारताची वर्णी लागली आहे.


User: Sakal

Views: 4.2K

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:57

Your Page Title