#NationalFarmersDay : राष्ट्रीय शेतकरी दिवस का साजरा केला जातो ? | National Farmers Day | Sakal |

#NationalFarmersDay : राष्ट्रीय शेतकरी दिवस का साजरा केला जातो ? | National Farmers Day | Sakal |

भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच 'शेती' हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. br पण हा शेतकरी दिवस का साजरा केला जातो आपल्याला माहिती आहे का???br भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा वाढदिवस (23 डिसेंबर) 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची म्हणजेच नाबार्ड ची स्थापना केली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाbr मात्र आज देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतोय परंतु,आज याच देशातील शेतकरी आज आंदोलन करतोय आणि आजच्याच म्हणजे शेतकरी दिवसाच्या दिवशी उभ्या जगाला पोसणारा शेतकरी उपाशी राहणार आहे. हो दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी या शेतकऱ्यांना जेवण न करण्याचे आदेश दिले.जोपर्यंत कृषी कायदा मागे घेतला जात नाही तो पर्यन्त आम्ही मागे हटणार नाही.शेतकरी दिवसाचे औचित्य व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक वेळ जेवण न करण्याचे आवाहन शेतकर्यांना केले आहे.br शेतकऱ्याला सन्मानाने 'बळीराजा' म्हटले जाते. परंतु, प्रत्यक्षात हाच बळीराजा कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना या आपत्तींचा बळी झालेला काही प्रमाणत आपल्याला दिसतो. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे आहे. br आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या. जेणे करून त्यांनाही शेतकरी असण्याचा अभिमान वाटेल.br #NationalFarmersDaybr #KisanDiwasbr #किसानदिवसbr #किसानहमाराअभिमानbr #चौधरी चरण सिंहbr Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.


User: Sakal

Views: 32

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:51

Your Page Title