आमदार बबनराव लोणीकरांनी फोनवरून IPS अधिकाऱ्याला झापले; ऑडिओ क्लिप व्हायरल | Viral Audio | Sarkarnama

आमदार बबनराव लोणीकरांनी फोनवरून IPS अधिकाऱ्याला झापले; ऑडिओ क्लिप व्हायरल | Viral Audio | Sarkarnama

परतूरमधील एका उद्योजकाच्या घरावर प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याने धाड टाकली आहे.याबाबत व्यापाऱ्यांनी परतुरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे तक्रार केली.या तक्रारीनंतर संतापलेल्या भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी परतुरचे प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी हसन गौहर यांना फोन करुन कोर्टाच्या आदेशाशिवाय व्यापाऱ्याच्या घरावर टाकलेल्या धाडीबाबत विचारणा तर केलीच पण विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सांगत भाजपचे १०५ आमदार विधानसभेचं कामकाज चालू देणार नसल्याचा ईशाराही देऊन टाकला.परतुरमध्ये ओमप्रकाश मोर यांचं किराणा दुकान आहे.या किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीवरून प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी हसन गौहर यांनी पोलिसांचा फौजफाटा सोबत घेऊन धाड टाकली.पण धाडीत पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्यानं आणि धाड टाकताना पोलिसांकडे कोर्टाची ऑर्डर नसल्यानं आमदार लोणीकर यांनी पोलीस अधिकारी गौहर यांची चांगलीच खरडपट्टी काढली.गौहर हे बिहार मधील रहिवासी आहेत.


User: Sarkarnama

Views: 2

Uploaded: 2021-06-12

Duration: 03:52

Your Page Title