लॉकडाऊनच्या निषेधार्थ उदयनराजेंचे 'भीक मांगो';शास्त्रज्ञ सांगत नाहीत तोपर्यंत नो लॉकडाऊन|Sarakarnama

लॉकडाऊनच्या निषेधार्थ उदयनराजेंचे 'भीक मांगो';शास्त्रज्ञ सांगत नाहीत तोपर्यंत नो लॉकडाऊन|Sarakarnama

लॉकडाऊनच्या निषेधार्थ साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवई नाका येथे पोत्यावर बसून 'भीक मांगो' आंदोलन केले. यावेळी पोवई नाक्यावरून ते चालत जिल्हाधिकारी कार्यालयात हातात ताट घेऊन गेले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणी आहे का... आमचे ऐकायला.. असे ओरडून विचारले. पोलिसांनी जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर तहसिलदार बाहेर आले. यावेळी उद्यनराजेंनी जमा झालेली चारशे रूपयांची भीक तहसिलदारांच्या हातात सुपूर्द केली. जोपर्यंत शास्त्रज्ञ सांगत नाहीत तोपर्यंत नो लॉकडाऊन, उदयापासून सगळे सुरू होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 06:47