Reservation : पदोन्नतीबाबतचा निर्णय सकारात्मक करण्याचा प्रयत्न - Nitin raut Maharashtra |Sarakarnama

Reservation : पदोन्नतीबाबतचा निर्णय सकारात्मक करण्याचा प्रयत्न - Nitin raut Maharashtra |Sarakarnama

नागपूर Nagpur: मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा Reservation प्रश्‍न अजूनही कायम आहे. याविषयी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray, पाटबंधारे मंत्री अशोक चव्हाण ashok chavan यांचे आभार मानतो. कारण त्यांच्याच प्रभावाने आणि पुढाकाराने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीसंबंधी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांच्याशी चर्चा झाली आहे आणि येत्या सोमवारी त्यासंदर्भात बैठक होणार आहे. यामध्ये संबंधित तांत्रिक मुद्द्य़ांवर आम्ही चर्चा करणार आहोत. त्या जीआरमध्ये जो असमंजसपणा आहे, त्यावर चर्चा झाल्याशिवाय त्यामध्ये दुरुस्ती होणे शक्य नाही. त्यामुळे पदोन्नतीबाबतचा निर्णय सकारात्मक कसा करता येईल, असाच आमचा प्रयत्न राहणार आहे, असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री येथे म्हणाले.


User: Sarkarnama

Views: 0

Uploaded: 2021-06-12

Duration: 04:44

Your Page Title