#Shorts #DailyYoga आजचे आसन : वीरभद्रासन | Sakal Media | SAAM TV | Dainik Gomantak |

#Shorts #DailyYoga आजचे आसन : वीरभद्रासन | Sakal Media | SAAM TV | Dainik Gomantak |

#Shortsbr #DailyYogabr br आजचे आसन : वीरभद्रासनbr br वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव या आसनाला दिले गेले आहे. हे आसन कसं करावं आणि त्याचे फायदे कोणते ते पाहुयात..br br वीरभद्रासन कसे करावे?br br सरळ उभे रहा. दोन्ही पायांत ३-४ फूट अंतर असू द्या. उजवा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस वळवा व डावा पाय १५ अंशांवर वळवा. दोन्ही हात उचलून खांद्यांच्या रेषेत आणावे. हात जमिनीस समांतर आहेत का हे तपासून पहा. त्यानंतर श्वास सोडत उजव्या गुडघ्यातून वाका आणि उजवीकडे वळून पहा. या आसनात स्थिर उभे रहा. नंतर हीच कृती डाव्या बाजूसही करा. यावेळी डावा पाय ९० अंश बाहेरच्या बाजूस तर उजवा पाय १५ अंश वळवा.br br वीरभद्रासनाचे फायदे कोणते?br br - हात, पाय आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी येते.br - शरीर संतुलित राहते आणि काम करण्याची क्षमता वाढते.br - खांद्यांमधला ताण कमी होतो.br - स्नायूंना बळकटी मिळाल्याने शरीराला योग्य आकार प्राप्त होतो.


User: Sakal

Views: 868

Uploaded: 2021-07-06

Duration: 00:27

Your Page Title