केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सटाण्यात बैलगाडी मोर्चा

केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सटाण्यात बैलगाडी मोर्चा

सटाणा (जि.नाशिक) : पेट्रोलचे दर शंभरी पार, तर डिझेलचा भाव ९७ रुपयांवर येऊन ठेपला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर ८०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मोदी सरकारने कोरोना संकट काळात मोठ्या प्रमाणावर डिझेल, पेट्रोल, गॅसवर कर लादत कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवला असून सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. br br केंद्र सरकारच्या निषेधार्थ सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार दीपिका चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत बागलाण तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला आहे.


User: Sakal

Views: 1.3K

Uploaded: 2021-07-09

Duration: 01:56

Your Page Title