अकोला : रात्रीपासून मुसळधार, अनेक घरे पाण्याखाली

अकोला : रात्रीपासून मुसळधार, अनेक घरे पाण्याखाली

अकोला : गेले तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे.अनेक घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले आहे. मोर्णा नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनी सतकर्तेचा इशारा दिला आहे. br अकोला शहरातील डाबकी रोड, जुने शहर, घुसर मोठी उमरी, रतानलाल प्लॉट, तसेच जवाहर नगर, गोकुळ कॉलनी ,प्रसाद सोसायटी, गोइंका लेआउट, मुकुंद नगर आदी भागांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली. महानगरपालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे तसेच जनरेटरची संख्या कमी असल्यामुळे हे पाणी काढण्यास बरीच कसरत करावी लागली.


User: Sakal

Views: 686

Uploaded: 2021-07-22

Duration: 01:55

Your Page Title