Koyna Dam Water : कोयना धरणाच्या पाण्याचा रंग का बदललाय माहिती आहे? | Satara | Karad | Sakal Media

Koyna Dam Water : कोयना धरणाच्या पाण्याचा रंग का बदललाय माहिती आहे? | Satara | Karad | Sakal Media

Koyna Dam Water : कोयना धरणाच्या पाण्याचा रंग का बदललाय माहिती आहे? | Satara | Karad | Sakal Mediabr कऱ्हाड (सातारा) (Satara) : कोयना धरणाच्या (Koyna Dam) भिंतीपासून अवघ्या चार किलोमीटरमध्ये डोंगरात भूस्खलन झाले आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या (Koyna Dam water) पाण्याचा पहिल्यांदाच यंदा रंग बदललेले पाणी कोयना नदी मिसळत आहे. धरणालगतच्या भूस्खलनाची माती धरणाच्या पाण्यात मिसळली आहे. त्यामुळे तेथील गाळात वाढ झाली आहे. कोयना धरण सुरक्षीत आहे, मात्र धरणांतर्गत भूस्खलनाच्या धरणाच्या आयुष्यमानावर परिणाम होतो आहे, असा इशारा भुगर्भशास्त्रज्ञांनी दिला आहे. कोयना धरण सुरक्षा समितीवर काम केलेले भुगर्भशास्त्रज्ञ प्रा. देशपांडे (Professor Deshpande) यांनी पाण्याच्या बदलेल्या रंगाचा अभ्यास केला आहे. कोयना, मोरणा खोऱ्याच्या प्रा. देशपांडे अनेक वर्षापासून अभ्यास करत आहेत. प्रा. देशपांडे सांगली येथील वॉलचद अभियांत्रकी महाविद्यालयात आहे. कऱ्हाड त्यांचे मुळगाव आहे. आंबेघर, मिरगावला भूस्खल होवू शकते, याचा वीस वर्षापूर्वीच धोका व्यक्त केला होता.


User: Sakal

Views: 652

Uploaded: 2021-08-04

Duration: 02:42

Your Page Title