Kolhapur; महापुरापासून कायमस्वरूपी हवे स्वातंत्र्य

Kolhapur; महापुरापासून कायमस्वरूपी हवे स्वातंत्र्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील महापुराची स्थिती अटोक्यात येण्यासाठी पुनर्वसन हा मार्ग नव्हे. आंतरराज्य योग्य समन्वयाने पूरस्थिती नियंत्रणात राहू शकते, हे यापूर्वी आणि याही वर्षी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पूर्नरवसन हा मार्ग नाही, असे स्पष्ट मत आज पूरग्रस्तांसाठी लढणारे, पूरग्रस्त, आणि महापुरावर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींनी ‘सकाळ'च्या सिटीझन एडिटर या व्यासपीठावर मांडले. पूनर्वसनासाठी आणि पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जितका निधी खर्च होतो त्या पेक्षा तो पूरनियंत्रणासाठी केला तर कायम स्वरुपी प्रश्‍न निकाली निघेल अशी भूमिका तज्ज्ञांनी सकाळच्या व्यासपीठावरून व्यक्त केले. ‘सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी ‘सकाळ'ची भूमिका विषद केली. निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी आभार मानले. मुख्य बातमीदार निवास चौगुले यांनी स्‍वागत केले.


User: Sakal

Views: 1.9K

Uploaded: 2021-08-15

Duration: 04:50