Bhagvat Karad: मंत्र्यांकडूनच नियमांना केराची टोपली, पाहा कसे बसवले नियम धाब्यावर

Bhagvat Karad: मंत्र्यांकडूनच नियमांना केराची टोपली, पाहा कसे बसवले नियम धाब्यावर

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड(Bhagvat Karad) यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवल्याची घटना समोर आलीय...हिंगोली(Hingoli) शहरात भागवत कराड यांनी चक्क पावणे अकरा वाजता सभा घेतली.. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा हिंगोली शहरात रात्री नऊ वाजता दाखल झाली... रात्री पावणे अकरा वाजता हिंगोलीच्या वंजारवाडा भागात मंत्री कराड यांची जाहीर सभा झाली... पुढे ही यात्रा थेट हिंगोलीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या सराफा भागात पोहचली...या ठिकाणी काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करत, चक्क रात्री साडे अकरा वाजता भाजप(BJP) शाखेचे अनावरण करण्यात आलं...यावेळी सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले.


User: Sakal

Views: 158

Uploaded: 2021-08-18

Duration: 01:47

Your Page Title