ऑनलाइन रिलीजवर आयनॉक्सचा संताप | Amitabh Bachchan, Ayushmann Khurrana | Lokmat CNX Filmy

ऑनलाइन रिलीजवर आयनॉक्सचा संताप | Amitabh Bachchan, Ayushmann Khurrana | Lokmat CNX Filmy

अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणा यांचा ‘गुलाबो सिताबो’, विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ हे सिनेमे आता चित्रपटगृहांत नाही तर ऑनलाईन रिलीज होणार, हे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. लॉकडाऊनमध्ये गेल्या दीड-दोन महिन्यांपासून लोकांना एकही नवा सिनेमा बघता आलेला नाही. त्यामुळे काही प्रेक्षक यामुळे खूश आहेत. पण दुसरीकडे आयनॉक्स थिएटर्स मात्र नाराज आहे. होय, आयनॉक्स थिएटर्सने एक पत्रक जारी करून याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.br लॉकडाऊनमुळे देशातील सगळी थिएटर्स बंद आहेत. ती कधी उघडतील आणि उघडली तरी प्रेक्षक चित्रपटगृहांकडे पुन्हा आधीसारखे फिरकतील का? या चिंतेपोटी अनेक निर्माता-दिग्दर्शकांनी आपले काही आगामी सिनेमे डिजिटल रिलीज करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच आता हे सिनेमे चित्रपटगृहांत नाही तर थेट अ‍ॅमेझॉन प्राईम व अशा काही प्लॅटफॉर्मवर रिलीज होतील. गुलाबो सिताबो आणि शंकुतला देवी या सिनेमांनी तशी घोषणाही केली आहे. मेकर्सच्या याच निर्णयावर आयनॉक्स थिएटर्सनी नाराजी व्यक्त केली आहे.br #LokmatNews #AmitabhBachchan #AyushmannKhurrana #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:08

Your Page Title