करण जोहर बनला बॉबी | Karan Johar Rishi Kapoor Face mapping | Bobby Song | Lokmat CNX Filmy

करण जोहर बनला बॉबी | Karan Johar Rishi Kapoor Face mapping | Bobby Song | Lokmat CNX Filmy

लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडचे सेलिब्रिटी कुठे बिझी आहेत, याचे उत्तर एकच़ ते म्हणजे सोशल मीडियावर. होय, बॉलिवूडचे सगळेच सेलिब्रिटी सध्या सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. कुणी फिटनेस व्हिडीओ शेअर करताहेत, कुणी रेसीपी तर कुणी आणखी काही. बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व दिग्दर्शक करण जोहर हाही याला अपवाद नाही. आपल्या मुलांबरोबरचे फनी व्हिडिओ शेअर करत करण सध्या लोकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. याचा एक भाग म्हणून करणने अलीकडे ‘लॉकडाऊन विथ जोहर्स’ ही सीरिज सोशल मीडियावर आणली होती. आता या सीरिजनंतर करण एक नवीन व्हिडिओ घेऊन आला आहे, ज्यात तो फेस मॅपिंगच्या मदतीने ‘बॉबी’ बनला आहे. होय, ‘बॉबी’ या चित्रपटात ऋषी कपूर आहेत. पण या व्हिडीओत चक्क ‘बॉबी’मधील गाण्यात करण जोहर दिसतोय. तो सुद्धा हुबेहुब बॉबीसारखा. हा व्हिडिओ करणच्या एका चाहत्याने तयार केला आणि करणने तो शेअर केला आहे.br br #LokmatNews #BobbySong #RishiKapoor #KaranJohar #lokmatcnxfilmybr #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 01:39

Your Page Title