पोलिसांवर हात उचलाल तर याद राखा | Hemant Dhome and Sonalee Kulkarni | Lokmat CNX Filmy

पोलिसांवर हात उचलाल तर याद राखा | Hemant Dhome and Sonalee Kulkarni | Lokmat CNX Filmy

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराच्या बाहेर पडू नये असे सतत आवाहन सरकारकडून केले जात आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. पण काही लोक पोलिसांचे न ऐकता काहीही काम नसताना घराच्या बाहेर फिरत आहेत आणि एवढेच नव्हे तर पोलिसांनी अडवले तर पोलिसांवरच हात उचलत आहेत. आतापर्यंत अशा अनेक केसेस केवळ महाराष्ट्रात नाहीत तर भारतभर झाल्या आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे.br पिंपरी येथे नुकतेच पोलिसांना मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणानंतर हेमंतने सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले आहे की, बंदुक द्या पोलिसांना काठ्या माणसांसाठी असतात... या जनावरांसाठी गोळ्याच... हिंमत नाही झाली पाहिजे परत... br br #LokmatNews #hemantdhome#sonaleekulkarni #lokmatcnxfilmybr #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:14

Your Page Title