पोलिस मामांना अशोक मामांकडून मेजवानी | Ashok Saraf and Nivedita Joshi Saraf | Lokmat Cnx Filmy

पोलिस मामांना अशोक मामांकडून मेजवानी | Ashok Saraf and Nivedita Joshi Saraf | Lokmat Cnx Filmy

जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढणा-या वॉरिसर्सचे अनेकांनी आभार मानलेत. अनेकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. आता आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अशोक मामा अर्थात अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ अहोरात्र झटणा-या या पोलिसांना एक छोटासा ‘थँक्यू’ म्हणून आमरसाचे जेवण देणार आहेत.होय, कोरोनाच्या संकटाच्या काळात आपले पोलिस बांधव जीवाची पर्वा न करता अहोरात्र रस्त्यावर पाहारा देत आहेत. न थकता कर्तव्य बजावत आहेत. या पोलिस बांधवांचे आभार व्यक्त करण्यासाठी अशोक सराफ व निवेदिता यांनी एक फक्कड बेत आखला आहे.br ओशिवारा पोलिस ठाण्यातील पोलिस बांधवांसाठी आज दुपारी साडे बारा वाजता दिवसपाळी कर्तव्यावरील पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना सराफ दांम्पत्य स्वत:च्या हाताने बनवलेले आमरस व पुरीचे जेवण देणार आहे़. पोलिस बांधवांप्रती आभार व्यक्त करण्याचा यापेक्षा इतका सुंदर बेत कुठला असू शकेल.br br #lokmatcnxfilmy #Ashoksaraf#Niveditajoshisarafbr #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 02:20