अनिल थत्तेना झाली कोरोनाची लागण | Anil Thatte Corona Positive | Lokmat CNX Filmy

अनिल थत्तेना झाली कोरोनाची लागण | Anil Thatte Corona Positive | Lokmat CNX Filmy

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. तसेच देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात कित्येक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात कोरोनाची लागण काही कलाकारांना झाल्याचंही समोर आले आहे. आता बिग बॉस मराठी फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. खुद्द अनिल थत्ते यांनीच एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.br br अनिल थत्ते यांनी व्हिडिओतून सांगितले की, सध्या मी रुग्णालयात असून मला कोरोनाची लागण झाली आहे. गेले अनेक दिवस कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो. मात्र आज तो व्हायचा तेव्हा होणार तेव्हा होतोच या निष्कर्षाला मी आलो. एवढी काळजी घेऊनही जर कोरोना होणार असेल तर काय म्हणायचं. आता कोरोनाची भीती संपली. तसेच कोरोना सोबत डायबिटीज वगैरे अन्य आजार असूनही प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आजारातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर प्लाझ्मा देण्याचाही संकल्प केला असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.br #lokmat #corona #anilthatte #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:16

Your Page Title