मॉडेल पाऊलाने लावले साजिदवर लैंगिग अत्याचाराचे आरोप | Sajid Khan Harassment | Lokmat CNX Filmy

मॉडेल पाऊलाने लावले साजिदवर लैंगिग अत्याचाराचे आरोप | Sajid Khan Harassment | Lokmat CNX Filmy

2018 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने सुरु केलेल्या ‘मीटू’ मोहिमेने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले होते. या मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्री, मॉडेलनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते़. दिग्दर्शक साजिद खान यापैकी एक. साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. आता भारतीय मॉडेल पाऊला हिनेही आपले मौन सोडले असून दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप लावले आहेत. ‘मी 17 वर्षांची असताना साजिद खानने काम देण्याच्या बहाण्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला होता अशा आशयाची पोस्ट तिने तिच्या इन्स्टाग्रामवर केली आहे. तिच्या या आरोपाने पुन्हा एकदा ‘मीटू’ मोहिम चर्चेत आली आहे.br पाउलाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘ मीटू चळवळीदरम्यान मी गप्प राहिले कारण या इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नव्हता आणि मला माझ्या कुटूंबासाठी काम करणे जरुरी होते. मात्र आता माझे आईवडिल माझ्यासोबत नाहीत. म्हणून मी साजिद खान याच्याविरोधात बोलू शकते. मी 17 वर्षांची असताना त्यांनी माझा लैंगिक छळ केला होता. त्यावेळी साजिद खानचा ‘हाऊसफुल’ चित्रपट येणार होता. या चित्रपटात काम मिळविण्यासाठी मी त्यांच्याकडे गेली असता त्याने माझ्याशी अश्लील भाषेत संभाषण केले. मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि मला कपडे उतरविण्यासा सांगितले. देवालाच माहित असेल असे त्याने किती मुलींसोबत केले असेल.’br ‘मला हे सांगण्यासाठी कोणी बाध्य केलेले नाही. ही गोष्ट जगासमोर यावी, म्हणून आज मी यावर बोलतेय. तेव्हा मी लहान होते. मात्र आता मी गप्प नाही बसणार. साजिद खानला जेल झाली पाहिजे, अशी मागणीही पाउलाने केली आहे. br #lokmat #Lokmatcnxfilmy #metoo #sajidkhanbr आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 0

Uploaded: 2021-08-24

Duration: 03:20