Mahabaleshwar: 48 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आंबेनळी घाटातील वाहतूक सुरु

Mahabaleshwar: 48 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आंबेनळी घाटातील वाहतूक सुरु

महाबळेश्वर (सातारा) : तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाट रस्त्याची दुर्दशा झाल्याने किल्ले प्रतापगड परिसरातील २२ गावांचा संपर्क तुटला होता. तसेच हाच घाटरस्ता कोकण विभागाला देखील जोडत असल्याने या भागातील नागरिकांची दळण-वळणाची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. आज या घाटरस्त्यावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मात्र ट्रक, एस.टी बस या सारख्या अवजड वाहनांना तूर्तास तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टीने तालुक्याचे मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने आंबेनळी घाटरस्त्याची मोठी दुर्दशा झाली. या घाटरस्त्यावर तीसहून अधिक ठिकाणी छोट्या-मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते, तर मेटतळे गावापासून अंदाजे एक ते दोन कि.मी अंतरावर मुख्य रस्ता तीस फूट खचल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली होती.


User: Sakal

Views: 205

Uploaded: 2021-09-07

Duration: 01:45