अचंबित करणारा बाहुबली प्रभास यांचा नवीन लुक | Bahubali Actor Prabhas New Look

अचंबित करणारा बाहुबली प्रभास यांचा नवीन लुक | Bahubali Actor Prabhas New Look

Amit Jadhav Thikana: अभिनेता प्रभासनं त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना अनोखी भेट देणारअसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे प्रभासचे चाहते त्याच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघत होते. प्रभासने दिलेल्या शब्दानुसार त्याने आज चाहत्यांना त्याचा आगामी चित्रपट ‘साहो’ च्या फर्स्ट लूकची ट्रीट दिली आहे.br प्रभासचा आज ३८ वा वाढदिवस आहे. त्यानिमीत्त चित्रपट निर्माते युव्ही क्रिएशनने तसेच प्रभासने स्वत:या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केलाय यामध्ये प्रभास संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे परिधान करून पहाटेच्या वेळी रस्त्याच्या मधून चालताना दिसत आहे. आजूबाजूला धुके आहे, यात प्रभासने चेहऱ्यावर काळा स्कार्फही बांधला असून डोळ्यातून त्याचा निडरपणा दिसून येतोय. त्याच्या या लूकमुळे चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकतता फार वाढली आहे.प्रभासच्या वाढदिवशी टि्वटरवर देखील प्रभासचाच जलवा बघायला मिळत आहे. टि्वटरवर ‘हॅप्पी बर्थडे प्रभास’ हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर असून त्या खालोखाल ‘साहो’ चा फर्स्ट लूकचा ‘साहो फर्स्ट लूक’ हा हॅशटॅग ट्रेंडंमध्ये आहे.


User: Lokmat

Views: 1.8K

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:22

Your Page Title