खराखुरा फास्टर फेणे | Real Faster Fene | Latest Marathi News | Lokmat News

खराखुरा फास्टर फेणे | Real Faster Fene | Latest Marathi News | Lokmat News

Sonlai Marathi Thikana: मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका 10 वर्षे वयाच्या सागर ऊर्फ यशवर्धन नावाच्या मुलाने चोराशी दोन हात केले. इतकेच नव्हे तर त्याला आईच्या मदतीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी आईवडिलांचा मोबाइल क्रमांक विचारण्याच्या बहाण्याने घरात शिरला होता. चोराने दरवाजा लावून घेण्याच्या अाधीच पायाने दरवाजाचा स्टाॅपर लावला आणि आरडाओरड करत घराच्या बाहेर धाव घेतली.त्यांनी मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला व चोरट्याला पकडले. त्याला घरात बंद करून पोलिसांना कळवले.सागरचे वडील देवाशिष म्हणाले, चोरीची घटना घडत असताना मी काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. घरात चोर शिरला असल्याचा, पत्नी श्वेताचा फोन आला. ती म्हणाली, 100 क्रमांकावर संपर्क साधला पण कोणी आले नाही. मी घरी आल्यानंतर शाहपुराचे ठाणेदार जितेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधला. ते पाच मिनिटांतच घरी आले. मला घरात सीसीटीव्ही बसवायचे होते.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:18