FTII (एफटीआयआय)चे नवनिर्वाचित अध्यक्ष Anupam Kher यांना अर्धांगवायूचा झटका | Bollywood News

FTII (एफटीआयआय)चे नवनिर्वाचित अध्यक्ष Anupam Kher यांना अर्धांगवायूचा झटका | Bollywood News

एफटीआयआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुपम खेर यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. त्यावेळी अनुपम खेर यांना स्टार आणि सुपरस्टारमध्ये काय फरक आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अनुपम खेर यांनी सांगितले की, ‘यश आणि अपयशाची नेमकी व्याख्या मांडणे तसे कठीणच आहे. कारण, या व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या असतात. माझ्या मते कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन किंवा त्या गोष्टी हाताळण्याची पद्धतच तुम्हाला यशाच्या पायरीपर्यंत नेऊन सोडतो.’ आयुष्यात आपल्या वाट्याला येणाऱ्या यशाप्रमाणेच अपयशालाही महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी अनुपम खेर यांनी ‘हम आपके है कौन’, या चित्रपटाच्या वेळचा किस्सा सांगितला. “त्या चित्रपटाच्या वेळी माझ्या चेहऱ्यावर अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे चेहऱ्याच्या हालचालींवर मर्यादा आली होती. त्यावेळी ‘हम आपके है कौन’ मधील अत्यंत महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण सुरु होते, ज्यामध्ये आम्ही टेरेसवर असतो आणि एक बैठा खेळ खेळत असतो. तेव्हा चित्रीकरण सुरू असताना माझ्या लक्षात आले की, आपला चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायुंनी काम करणे बंद केले आहे. अनिल कपूरची पत्नी सुनिता हिने आणखी एक गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली की, ‘अनुपम तुझ्या एका डोळ्याची भुवईही वर जात नाही’. त्यावेळी मी या गोष्टीकडे लक्ष दिले. दुसऱ्या दिवशी दात घासताना चूळ भरतेवेळी माझ्या लक्षात आले की, माझ्या तोंडातून एका बाजूने पाणी बाहेर येत होते.” परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यानंतर यशजींच्या सांगण्यावरुन अनुपम खेर यांनी डॉक्टरकडे धाव घेतली. डॉक्टरने त्यांना दोन महिने आरम करण्याचा सल्ला दिला. या दोन महिन्यांमध्ये त्यांच्यावर संपूर्ण औषधोपचार, फिजिओथेरेपी करण्यात येणार होती. दोन महिने काम न करण्याचा सल्ला न ऐकत खेर यांनी थेट चित्रपटाच्या सेटवर जात चित्रीकरण सुरु ठेवले. मुख्य म्हणजे तेव्हा सेटवर उपस्थित सलमान खान, माधुरी दीक्षित आणि इतर सर्वांनाच खेर वेडेवाकडे तोंड करुन एखाद्या दृश्यासाठी अभिनय करत आहेत असेच वाटले.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 02:29