वधू निघाली 'तीस मार खान' पहा अजब लग्नाची गजब गोष्ट | Con Bride | Interesting Videos | Lokmat News

वधू निघाली 'तीस मार खान' पहा अजब लग्नाची गजब गोष्ट | Con Bride | Interesting Videos | Lokmat News

भारतीय समाज व्यवस्थेत लग्नाला अधिक मान दिला जातो. याला इतके महत्व दिले जाते की, लग्न जीवनातील महत्वाची घटना असावी. त्यामुळे वधुवर किती महत्वाचे आहेत याला अनन्यसाधारण महत्व आहे. पण बीड मध्ये लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत नवरदेवाच्या हातावर ‘तुरी’ देत सोन्याच्या दागिन्यांसह पळ काढणाऱ्या नवरीला व तिच्या साथीदाराला पेठ बीड पोलिसांनी सोमवारी परभणीतून बेड्या ठोकल्या. दरम्यान, या महिलेने व साथीदारांनी आणखी काही जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. लक्ष्मण विठ्ठल गाडेकर (रा. शिरूर) यांचा विवाह 1 डिसेंबर 2016 रोजी सरिता बालाजी चक्कर (31, रा. परभणी) यांच्याशी बीड शहरातील कनकालेश्वर मंदिरात झाला होता. यानंतर त्यांचे नाव बदलून पूजा ठेवण्यात आले होते. दरम्यान, लग्नानंतर पाच दिवसांत सरिता हिने लग्नावेळी लक्ष्मण यांनी अंगावर घातलेल्या 35 हजारांच्या दागिन्यांसह माहेर गाठले. त्यानंतर ती परत आलीच नाही. पत्नी माहेरी येत नसल्याचे पाहून लक्ष्मण यांनी सासुरवाडी गाठली. मात्र त्या पत्त्यावर ना सरिता होती ना मध्यस्थी करणारे अन्य. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:36

Your Page Title