लैंगिक शोषण करणे ही देशभक्ती | Harassment Is Legal In This Country | Lokmat Marathi News

लैंगिक शोषण करणे ही देशभक्ती | Harassment Is Legal In This Country | Lokmat Marathi News

इजिप्तमधील कट्टर नेते व वकील नबीह अल-वाहश यांनी महिलांवर आक्षेपार्ह विधान केल्याने सोशल मीडियावर वातावरण तापले आहे. एका टीव्ही शोमध्ये नबीह यांनी रिप्ड जीन्स घालणाऱ्या तरुणींना छेडने ही देशभक्ती आणि बलात्कार करण हे राष्ट्रीय कर्तव्यच असल्याच म्हटलं आहे. एवढ्यावरच नबीह थांबले नसून अंगप्रदर्शन करणाऱ्या महिला पुरुषांना आमंत्रणच देत असतात असही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी येथील अल-असीमा वाहिनीने इनफ्राद या शोमध्ये नबीह यांना आमंत्रित केले होते. शरीर विक्री आणि लैंगिक शोषण यावर कायद्यात असलेल्या मसुद्यांवर या कार्यक्रमात चर्चा सुरू होती. यादरम्यान नबीह यांनी महिलांच्या पेहरावावर बोलण्यास सुरुवात केली.अंग उघडे ठेवून फिरणाऱ्या तरुणीचे लैंगिक शोषण करणे ही देशभक्ती असून तिच्यावर बलात्कार करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असं मला वाटतं असं नबीह म्हणाले.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:18

Your Page Title