Kamal Hassan मुळे 'नवा वाद' सुरू होण्याची शक्यता आहे | Kamal Hassan New Controversy

Kamal Hassan मुळे 'नवा वाद' सुरू होण्याची शक्यता आहे | Kamal Hassan New Controversy

अभिनयानंतर आता राजकारणात प्रवेश करत असलेल्या कमल हसन यांनी ‘हिंदू दहशतवादा’वरून नवा वाद छेडला आहे. उजव्या विचारसरणीने आता ‘मसल पावर’चा वापर करण्यास सुरूवात केली आहे. हिंसाचारात त्यांचा सहभाग असून, हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीका त्यांनी तामिळ साप्ताहिक ‘आनंदा विकटन’ मध्ये लिहिलेल्या लेखातून केली. पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत. पण आता ते हिंसेत सहभागी होतात, असे म्हणत लोकांचा सत्यमेव जयते वरील विश्वास उडत चालला असल्याचे त्यांनी आपल्या लेखात लिहिले. कमल हसन यांनी केरळ सरकारचे कौतुकही केले. केरळने तामिळनाडूपेक्षाही चांगल्या पद्धतीने धार्मिक हिंसाचाराचा प्रश्न हाताळल्याचे ते म्हणाले. कमल हसन यांच्या या लेखामुळे हिंदू दहशतवादावरून पुन्हा एकदा नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.


User: Lokmat

Views: 336

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:12

Your Page Title