पद्मविभूषण शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले | Shashi Kapoor Latest News

पद्मविभूषण शशी कपूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले | Shashi Kapoor Latest News

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर अनंतात विलीन झाले आहेत. मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शशी कपूर यांना 2011 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. पद्मविभूषणने गौरविण्यात आलेल्या व्यक्तींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात. शशी कपूर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तीन राऊंड फायरिंग करण्यात आले. पोलिसांची एक तुकडी यावेळी येथे उपस्थित होती.br शशी कपूर यांना शोकाकूल वातावरणात कलाकारांनी अखेरचा निरोप दिला. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, श्वेता नंदा, काजोल, नीतू कपूर, रणबीर कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, बोनी कपूर, ऋषी कपूर, राणी मुखर्जी, मकरंद देशपांडे, सचिन पिळगावकर, के.के. मेनन, सलीम खान,  शक्ती कपूर यांच्यासह अनेक कलाकार यावेळी स्मनाशभूमीत उपस्थित होते. शशी कपूर यांची मुले संजना कपूर आणि करण कपूर यूएसला होती. आज सकाळी ती मुंबईत दाखल झाली.


User: Lokmat

Views: 2.3K

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:18

Your Page Title