चेहऱ्याचे सौदर्य खुलवण्याचे सोपे आणि सहज साध्य उपाय | Lokmat News

चेहऱ्याचे सौदर्य खुलवण्याचे सोपे आणि सहज साध्य उपाय | Lokmat News

वाढतं प्रदूषण, जीवनशैली तील आव्हाने चेहऱ्याची त्वचा रुक्ष होत जाते. मग बाजारातील महागडी उत्पादने वापरली जातात. मात्र काही घरगुती सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.br एक चमचा मध घ्या. त्यामध्ये लिंबाचे काही थेंब टाका. हे मिश्रण रोज चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.स्क्रबिंगमुळे चेहऱ्या वरील मृत कोशिका आणि धूळ नाहीशी होऊन रोमछिद्रे मोकळी होतात. घरच्याघरी स्क्रबिंग करण्यासाठी टोमॅटोचा वापर करा. टोमॅटोच्या तुकड्याने हलके मालिश केल्यास त्याचा नक्की चांगला फायदा होतो.त्वचेला उजळपणा आणण्यासाठी संत्र्याचा रस, एक चमचा मध आणि गुलाब जल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला लावा. सुकल्यानंतर चेहरा धुवा. चेहरा आणि मानेवर मध लावा. थोडे वाळल्यानंतर बोटांनी चेहऱ्याचा मसाज करा. मध वाळल्यानंतर कोमट पाण्याने ते साफ करा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:00