Latest Political Update | BJP ह्याच वर्षी घेऊ लोकसभेच्या निवडणुका | Lokmat News

Latest Political Update | BJP ह्याच वर्षी घेऊ लोकसभेच्या निवडणुका | Lokmat News

लोकसभा निवडणूक भाजप याच वर्षी घेऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.br समाजवादी पक्षाने असा दावा केला आहे की, याच वर्षात लोकसभा निवडणुकी साठी भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजपला पराभूत करण्या साठी सपाने रननीती बनवायला देखील सुरुवात केली आहे.सपाचे राष्ट्रीय सचिव राजेन्द्र चौधरी यांनी आज म्हटलं की, या वर्षाच्या शेवटी मध्य प्रदेशसह अनेक भाजप शासित राज्यांमध्ये निडवणुका होणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसोबतच लोकसभेची निवडणूक देखील भाजप सरकार घेऊ शकते.सपाने यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. पक्षाने प्रोफर्मा जारी करत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. जे ३१ जानेवारीपर्यंत जमा करायचे आहेत. त्यांनी म्हटलं की, बूथस्तरावर पक्षाला मजबूत करण्यासाठी सपाने तयारी सुरु केली आहे. यामुळे भाजपचा पराभव करणे शक्य होईल.


User: Lokmat

Views: 32

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:09

Your Page Title