अरे बापरे तिने चक्क एन्गेजमेंटच्या अंगठीसाठी ठेवले सुरक्षा रक्षक ! | Lokmat Marathi News

अरे बापरे तिने चक्क एन्गेजमेंटच्या अंगठीसाठी ठेवले सुरक्षा रक्षक ! | Lokmat Marathi News

हॉलिवूडची स्टार पेरिस हिल्टनने एन्गेजमेंटच्या अंगठीसाठी खास सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. बॉयफ्रेंड क्रिसने पेरिसला प्रपोज करताना ती अंगठी दिली होती. या अंगठीसाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे कारणही खासच आहे. काही दिवसांपूर्वी पेरिस आणि क्रिसची एन्गेजमेंट पार पडली. यावेळी क्रिसने तिला तब्बल २० लाख डॉलरची (१२ कोटी)ची हिऱ्याची अंगठी घातली आहे. इतकी महागडी आणि प्रिय व्यक्तीने दिलेली अंगठी नेहमी सोबत रहावी असे तिला वाटते. म्हणूनच पेरिसने अंगठीवर २४ तास नजर ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे.पेरिसने एन्गेजमेंट चे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत ‘ माझ प्रेम, माझा चांगला मित्र आणि माझ्या सोलमेटसोबत एन्गेज होऊन मी खूप आनंदी आहे, मी जगातील सर्वात नशीबवान मुलगी आहे. तू माझे स्वप्न पूर्ण केलेस’ अशी पोस्टही पेरिसने केली होती.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:18

Your Page Title