आणि मदतीला भारतीय जवान आले धावून | Latest Lokmat News Update | Lokmat News

आणि मदतीला भारतीय जवान आले धावून | Latest Lokmat News Update | Lokmat News

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्याकाही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. रस्त्यावर बर्फ साचल्यानं अनेक भागात वाहतूकही बंद झाली आहे. काही भागात धीम्या गतीनं वाहतूक सुरु आहेत. तंगमार्ग भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. अशातच पर्यटकांची गाडी निसरड्या रस्त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला कलंडली. यात काही प्रवाशी अडकले होते. जेव्हा भारतीय जवानांना ही गोष्ट समजली तेव्हा शीघ्र कृती दलातील जवान प्रवाशांच्या मदतीला धावून गेले आणि काही काळातच त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत प्रवाशांना बाहेर काढलं.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:01