Lokmat International News | जगातील हे आहे अजब - गजब शहर । व्हिडिओ पाहून व्हाल थक्क | Lokmat News

Lokmat International News | जगातील हे आहे अजब - गजब शहर । व्हिडिओ पाहून व्हाल थक्क | Lokmat News

लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्यांमुळे हैराण झालेले अनेक जण परदेशातही जाणे पसंत करतात. एकीकडे भारत आणि चीनमध्ये हे चित्र असताना परदेशात अनेक ठिकाणी लोकसंख्या कमी असल्याने ती वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र आता एक गोष्ट ऐकून तुम्ही नक्कीच थक्क होणार आहात. कारण कॅनडातील एका शहरात केवळ ४ व्यक्ती राहतात.ही गोष्ट तुम्हाला नक्कीच खरी वाटणार नाही. मात्र असं ठिकाण खरंच प्रत्यक्षात अस्तित्त्वात आहे. या शहराचं नाव आहे टिल्ट कोव. आता चारच लोक राहतात म्हटल्यावर या शहरात काहीच विशेष सुविधा नसतील असं आपल्यातील अनेकांना सहाजिकच वाटलं असेल. पण याठिकाणी पोस्ट ऑफिसपासून ते अगदी म्युझियमपर्यंत सगळं काही आहे. आता हे चार जणही या शहरात का राहतात तर त्यांना या जागेची देखभाल करावी लागते.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:14