Lokmat News Update | आणि कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव | Lokmat Marathi News

Lokmat News Update | आणि कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव | Lokmat Marathi News

कोल्हापूर येथील विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्यास आज मंत्रिमंडळा च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.कोल्हापूर येथे विमानतळाची उभारणी केल्यानंतर 1939 मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. सद्य:स्थितीत शासनाच्या प्रयत्नातून या विमानतळाचा विकास करण्यात येत असून प्रादेशिक जोडणी योजना मधून लवकरच विमान सेवा सुरु करण्यात येणार आहे.या निर्णयानुसार नामकरण प्रस्तावास आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहाची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे.


User: Lokmat

Views: 9

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:07