वाशिममधली डव्हा संस्थानवर भाविकांची मांदियाळी ! २०० क्विंटल महाप्रसादाचे वितरण

वाशिममधली डव्हा संस्थानवर भाविकांची मांदियाळी ! २०० क्विंटल महाप्रसादाचे वितरण

वाशिम - मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील श्री नाथ नंगे महाराज संस्थान येथील भव्य यात्रा महोत्सवांची सांगता २४ जानेवारी रोजी महाप्रसाद वितरणाने झाली. ५० ट्रॅक्टरद्वारे २०० क्विंटल महाप्रसादाचे वितरण भाविकांना करण्यात आले.  विदर्भाची पंढरी म्हणून डव्हा संस्थांचा उल्लेख केल्या जातो. दरवर्षी रथसप्तमीला भव्य यात्रेचे आयोजन असते. नाथनंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर श्री नाथनंगे महाराज व प. पू. विश्वनाथ महाराज यांच्या मूर्तीचे पूजन अभिषेक  करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:00