Lokmat News | Jammu Kashmir मध्ये गेल्या ४४ दिवसात तब्बल २६ जवान शहीद

Lokmat News | Jammu Kashmir मध्ये गेल्या ४४ दिवसात तब्बल २६ जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये यावर्षी ४४ दिवसात २६ जवानांना वीरगती प्राप्त झाली.काल संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी सुंजवाँ येथील लष्करी तळाला भेट दिली आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेतली. 'पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल. आम्ही  जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही.' असं त्या यावेळी म्हणाल्या.एकीकडे भारत सरकारकडून पाकिस्तानला कडक शब्दात सुनावलं जात असलं तरी पाकिस्तानी दहशतवाद्यां कडून भारतावर वारंवार हल्ले सुरु आहेत.३१ डिसेंबर जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये पाच जवान शहीद.३ जानेवारी जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर एक जवान शहीद, ६ जानेवारी चार पोलीस जवान शहीद झाले. १३ जानेवारी सुंदरबनी सेक्टरमध्ये १ जवान शहीद.१८ जानेवारी जम्मू-काश्मीरच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये १ जवान शहीद १९ जानेवारी बीएसएफचा एक जवान शहीद झाला.२० जानेवारी जम्मू-काश्मीर मध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दोन सुरक्षा रक्षक शहीद, ४ फेब्रुवारी 4 जवान शहीद.११ फेब्रुवारी जम्मूच्या सुंजवाँ मध्ये पाच जवान शहीद झाले.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:33

Your Page Title