काळ आला होता पण वेळ आली नव्हती | तिकीट तपासनीसाने वाचवले एका प्रवाशाचे प्राण | Lokmat Marathi News

काळ आला होता पण वेळ आली नव्हती | तिकीट तपासनीसाने वाचवले एका प्रवाशाचे प्राण | Lokmat Marathi News

कल्याण रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस शशीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखून २० वर्षीय तरूणाचे प्राण वाचवले. मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने कल्याण स्टेशनातून निघाली. त्याचवेळी ही गाडी पकडण्यासाठी संदीप चोणकर हा २० वर्षांचा तरूण चालत्या गाडीत चढायचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याचा तोल जाऊन तो गाडी आणि फलाट यातल्या फटीत गेला. मात्र त्याचवेळी शेजारी उभ्या असलेल्या शशीकांत चव्हाण यांनी प्रसंगावधान राखून त्या तरूणाला बाहेर खेचून काढलं आणि त्याचे प्राण वाचवले. चव्हाण यांच्या प्रसंगावधानाचं कौतुक होत आहे.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:07

Your Page Title