Lokmat Education News | बारावीची लेखी परीक्षांनमध्ये केले जाणार आहेत असे बंदोबस्त | HSC Exam | News

Lokmat Education News | बारावीची लेखी परीक्षांनमध्ये केले जाणार आहेत असे बंदोबस्त | HSC Exam | News

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 feb 2018 पासून सुरू होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर उशिरा येणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे वेळेच्या अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी वर्गात हजर राहावे, असे बारावी परीक्षेला राज्याच्या ९ विभागांमधून १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी बसले आहेत. राज्यभरातील २ हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ९ हजार ४८६ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ याप्रमाणे २५२ भरारी पथके नेमली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.


User: Lokmat

Views: 201

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:25

Your Page Title