Lokmat News | भ्रष्टचाराबा बतीत आजही अग्रस्थानी81 वे स्थान | Lokmat Marathi News

Lokmat News | भ्रष्टचाराबा बतीत आजही अग्रस्थानी81 वे स्थान | Lokmat Marathi News

भ्रष्टाचारा बाबतीत भारताची प्रतिमा अद्याप खराबच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. २०१७ सालच्या यादीत भारताचा क्रमांक  ८१वा आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराबाबत या अहवालात १८० देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. २०१६मध्ये भारताचा ७९ वा क्रमांक होता.  भ्रष्टाचारा विरोधात सर्व देशांना कडक संदेश देण्याच्या उद्देशाने १९९५ मध्ये हा निर्देशांक सुरु करण्यात आला होता. एखाद्या देशात किती भ्रष्टाचार होतो हे विश्लेषण, व्यापारी, तज्ञ आणि अनुभवाच्या आधारावर निश्चित केले जाते.  या यादीतील देशांना ० ते १०० दरम्यान गुण दिले जातात. ज्या देशांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे त्यांना ० तर जिथे स्वच्छ कारभार होतो त्यांना १०० गुण दिले जातात. गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील भारताला ४० गुण देण्यात आले आहेत. या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क या देशांचा क्रमांक पहिला लागतो. न्यूझीलंडला ८९ तर डेन्मार्कला ८८ गुण देण्यात आले आहेत.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:21

Your Page Title