भुसावळ स्थानकावर गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचा संतापभुसावळ (जि. जळगाव) | Lokmat News

भुसावळ स्थानकावर गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचा संतापभुसावळ (जि. जळगाव) | Lokmat News

भुसावळ स्थानकावर गाड्या खोळंबल्याने प्रवाशांचा संतापbr भुसावळ (जि. जळगाव) : मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून भुसावळसह अनेक स्थानकांवर रेल्वेगाड्यांचा खोळंबा मंगळवारी पहाटेपासून झाला आहे. दुपारपर्यंत काही गाड्या जागीच होत्या. यामुळे वैतागलेले प्रवासी भुसावळ येथे रेल्वेलाईनवर मोठ्या संख्येने उतरले व आमचीच गाडी प्रथम सोडा अशी मागणी करु लागले. संतप्त प्रवशांनी यावेळी बराच गोंधळ केला. या परिस्थितीपुढे रेल्वे प्रशासनही हतबल झाले.दरम्यान, गोदान, महानगरी, पुष्पक, वाराणसी- कुर्ला या चार गाड्या भुसावळच्या चार फलाटांवर दुपारी चाडेचार वाजेपर्यंत थांबूनच होत्या. मार्ग जसजसा सुरळीत होईल, तशा एकेक गाड्या सोडण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. यानंतर महानगरी एक्सप्रेस पावणेपाचवाजेच्या दरम्यान सोडण्यात आली.br व्हिडीओ- हबीब चव्हाण.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:22