'सिंघम'फेम काजलच्या चाहत्याला ६० लाखांचा गंडा | Lokmat Manoranjan

'सिंघम'फेम काजलच्या चाहत्याला ६० लाखांचा गंडा | Lokmat Manoranjan

आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या भेटीसाठी चाहते कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. ‘सिंघम’ चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ची भेट घेण्याच्या नादात तिचा फॅन ठकसेनांना बळी पडला. त्याने थोडे-थोडके नव्हे, तर तब्बल 60 लाख रुपये मोजले, मात्र एवढं करुन काजलची भेट झाली नाहीच.br br फिल्मस्टार्सच्या घराखाली पावसा-पाण्यात तास-तासभर उभे राहणारे चाहते आपल्यासाठी नवीन नाहीत. फिल्मच्या सेटवर सिताऱ्यांची एक झलक पाहण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक जण येतात. मात्र काजल अग्रवालच्या या चाहत्याने तिची भेट घेण्यासाठी लाखो रुपये मोजण्याचा पर्याय निवडला. अभिनेत्री काजल ही पैसे घेऊन मोबदल्यात फॅन्सना भेटणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे या चाहत्याची गाठ पडली ती भामट्यांशी.br br तामिळनाडूतील रामनंतपुरमचा रहिवासी असलेल्या या चाहत्याला आपली ओळख उघड करायची नाही. हा चाहता काजल अग्रवालच्या भेटीसाठी उत्सुक होता. तितक्यात त्याच्या नजरेत एक वेबसाईट आली. काजलची भेट घडवून देण्याचं आश्वासन या वेबसाईटवर देण्यात आलं होतं.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:47

Your Page Title