कोल्हापूर-बंगळुरू महामार्गावरुन वाहतूक सुरू, पहिला टँकर सोडला | Kolhapur Banglor Road

कोल्हापूर-बंगळुरू महामार्गावरुन वाहतूक सुरू, पहिला टँकर सोडला | Kolhapur Banglor Road

शिरोलीतील सांगली फाटा येथे महामार्गावर दोन्ही बाजूला पाणी आल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रविवारी सहाव्या दिवशीही ठप्प राहीली. महामार्गावरील पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतरच वाहतूक सुरू होईल. तोपर्यंत अत्यावश्यक सेवा कोल्हापूरला बोटीतूनच पुरवण्यात येणार असल्याचे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. रविवारी सकाळी महामार्गावर साडे तीन ते चार फुट पाणी होते. सकाळी आठ वाजता पोलीसांनी व एनडीआरआफच्या जवानांनी महामार्गावरील पूरात पोकलॅँड सोडून अंदाज घेतला त्यांनतर साडे नऊ वाजता २५ हजार लिटर पाण्याचा टॅँकर पाण्याचा कोल्हापूर शहरात पाठवण्यात आला. यानंतर दुपारी बारा वाजता एक पेट्रोलचा टॅँँकर पाठवण्यात आला पण पाण्याला गती खूप होती. यामुळे इतर कोणतेही वाहन दिवसभरात या पाण्यातून सोडले नाही. br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 59

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:51

Your Page Title