पूरग्रस्तांना Ramdas Athawale ची खासदार निधीतून 50 लाखांची मदत | Kolhapur -Sangali

पूरग्रस्तांना Ramdas Athawale ची खासदार निधीतून 50 लाखांची मदत | Kolhapur -Sangali

मुंबई | केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांना 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांसाठी आठवले यांनी प्रत्येकी 25 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.br br आपल्या खासदार निधीतून त्यांनी 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. आज आठवले यांनी सांगली कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला.br br br br सर्वच पक्षाच्या आमदार आणि खासदारांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन आठवले यांनी केलं. तसेच पूरग्रस्तांना सामाजिक, आर्थिक आणि मानसिक पाठिंब्याची गरज आहे, असं म्हटलं.br br दरम्यान, संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू आहे. अनेक राजकीय पक्ष, मराठी कलाकार, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था मदतीसाठी आपला हात पुढे करत आहेत.br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:02