ठाण्याचे पालकमंत्री Eknath Shinde यांच्याकडून ध्वजवंदन | Thane

ठाण्याचे पालकमंत्री Eknath Shinde यांच्याकडून ध्वजवंदन | Thane

ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते ७३ व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून या जिल्ह्याचा गतिमान विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षाही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी व्यक्त केली. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या सन्मानासह गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सुरू असतानाच विद्युतपुरवठा खंडित होऊन एसीदेखील बंद पडल्यामुळे पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.br br ध्वजारोहण समारंभप्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी यांची पत्नी सीमा नार्वेकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सुभाष पवार, माजी आमदार अनंत तरे, ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1K

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:05