मुंबईच्या भूमिगत मेट्रोची प्रतिकृती | Mumbai Subway Metro Model | Mumbai

मुंबईच्या भूमिगत मेट्रोची प्रतिकृती | Mumbai Subway Metro Model | Mumbai

मुंबई :मेट्रो-३ मार्गिकेवर धावणाऱ्या मेट्रोच्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रो-३ मेट्रोचे डब्बे बनविण्याचे काम अँलस्टाँम ट्रान्स्पोर्ट इंडिया लिमिटेड या कंपनीला दिलेले आहे. मेट्रो-३ या संपूर्णतः भूमिगत मेट्रो मार्गिकेला अॅक्वा लाईन असे संबोधले जाणार आहे. या डब्यांची रंगसंगती तसेच डब्यांची आंतर-बाह्य संरचना हा नावाला सुयोग्य अशी करण्यात येणार आहे.br कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो -३ मार्गिकेसाठी आठ डब्यांच्या एकूण ३१ गाड्या अँलस्टाँम या कंत्राटदाराद्वारे बनविण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या मेक ईन इंडिया या संकल्पनेप्रमाणे मेट्रो-३ मार्गिकेच्या सर्व गाड्याची निर्मिती अँलस्टाँम इंडिया यांच्या श्री सिटी, आंध्र प्रदेश येथील कारखान्यात होणार आहे. मेट्रो-३ चे डब्बे अद्ययावत असतील तसेच विना चालक कार्यन्वयनासाठी सक्षम असणार आहेत, असे एमएमआरसीमार्फत सांगण्यात आले. br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 89

Uploaded: 2021-09-13

Duration: 00:53

Your Page Title