आमदार निर्मला गावित यांनी बांधले शिवबंधन | Mumbai | Lokmat News

आमदार निर्मला गावित यांनी बांधले शिवबंधन | Mumbai | Lokmat News

इगतपुरीच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूरातील नेत्या रश्मी बागल यांनी बुधवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव यांनी या दोघींना शिवबंधन बांधले.br br निर्मला गावित यांनी मंगळवारीच आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला होता. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. गावित कुटुंबाच्या प्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत झाल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. 'निर्मला गावित यांनी कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला. माणिकराव गावित हे काँग्रेसमधले मोठे घराणे आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कुटुंबावर प्रेम केले होते. आता निर्मला गावित शिवसेना पक्षबांधणीसाठी काम करतील. उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे प्राबल्य आहेच; पण निर्मला गावित यांच्या येण्याने राहिलेली उणीव भरून निघेल', असे उद्धव म्हणाले.br br यावेळी सोलापूरातील राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी मंत्री दिगंबरराव बागल यांच्या कन्या रश्मी बागल यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर रश्मी बागल पत्रकारांना म्हणाल्या की, राजकारणात महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय कुणी राहू शकत नाही. मी करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना पक्षनेतृत्वाकडे इच्छा व्यक्त केली आहे. नेतृत्व काय तो निर्णय घेईल.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-09-13

Duration: 06:36

Your Page Title