राज ठाकरे ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार, मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त | ED Inquiry | Mumbai

राज ठाकरे ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार, मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त | ED Inquiry | Mumbai

मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे हे गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत. या नोटिशीत कोणत्याही कृत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास संबंधित व्यक्तीस जबाबदार धरून आपणाविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.br br आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद.


User: Lokmat

Views: 485

Uploaded: 2021-09-13

Duration: 01:09

Your Page Title